भजनी मालिका
← भजनांकडे परत

रुक्मांगदाकारणें एकादशीचा छंद । तेणे परमानंद प्रगटला

rukmangadakaranen ekadashicha chhand | tene paramanand pragatala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रुक्मांगदाकारणें एकादशीचा छंद । तेणे परमानंद प्रगटला ॥१॥ अंबऋषीकारणॆं द्वादशीचा छंद । तेणे परमानंद प्रगटला ॥२॥ प्रल्हादाकारणें हरिनामाचा छंद । तेणें परमानंद प्रगटला ॥३॥ एका जनार्दनीं एकविधा छंद । तेणॆं परमानंद प्रगटला ॥४॥