भजनी मालिका
← भजनांकडे परत

रुक्माईसी सांगे एकांतासी गोठी । गोर्‍याची कसवटी पांडुरंग

rukmaisi sange ekantasi gothi | gor‍yachi kasavati pandurang

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रुक्माईसी सांगे एकांतासी गोठी । गोर्‍याची कसवटी पांडुरंग ॥१॥ माझियाकारणें कर तोडियेले । सांकडें पडिलें मज त्याचें ॥२॥ माझिया भक्ताची मज राखणें लाज । म्हणोनियां गुज तुज सांगितलें ॥३॥ एका जनार्दनीं उभयतां निघाले । सांगाते घेतलें गरुडासी ॥४॥