भजनी मालिका
← भजनांकडे परत

रोकेडेंचि ब्रह्मा ब्रह्माज्ञानाचें गोठलें । तें उभें असे ठेल पंढरीये

rokedenchi brahma brahmadnyanachen gothalen | ten ubhen ase thel pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रोकेडेंचि ब्रह्मा ब्रह्माज्ञानाचें गोठलें । तें उभें असे ठेल पंढरीये ॥१॥ नये अनुमाना वेदांत सिद्धातियां । मा ब्रह्माज्ञानिया कोण पुसे ॥२॥ चारी वाचा जेथें कुंठीत पै जाहल्या । मौन त्या राहिल्या वेदश्रुति ॥३॥ एका जनादनी सारांचे हें सार । परब्रह्मा निर्धार पंढरीये ॥४॥