भजनी मालिका
← भजनांकडे परत

रात्रीं जाग्रण नामस्मरण चित्तीं । घडली ते तिथी एकादशी

ratrin jagran namasmaran chittin | ghadali te tithi ekadashi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रात्रीं जाग्रण नामस्मरण चित्तीं । घडली ते तिथी एकादशी ॥१॥ तियेचे हातीं विमानासी गती । चालावया पंथी वेळ नाहीं ॥२॥ तेव्हा पाचारिल्या अन्य याती नारी । नेणत्या कुमारी होत्या त्याही ॥३॥ तिळभरी नाहीं चालावया रीग । दवंडी पिटी वेगें शीघ्र राजा ॥४॥ एका जनार्दनी निघालिया सर्व । तो तेथें अपूर्व नवलाव ॥५॥