भजनी मालिका
← भजनांकडे परत

रात्री पळे येतांचि सविता । सिंहगर्जनें कुंजर चळता

ratri pale yetanchi savita | sinhagarjanen kunjar chalata

रचनाकार: संत निळोबा · अभंग
रात्री पळे येतांचि सविता । सिंहगर्जनें कुंजर चळता ॥१॥ तैसें हरिभक्तां सांकडें । येताचि पळे दृष्टीपुढें ॥२॥ महालक्ष्मीचें वारें । येतांचि दरिद्र घे माघारें ॥३॥ निळा म्हणे हरीच्या स्मरणें । हारपोनि ठाती जन्ममरणें ॥४॥