भजनी मालिका
← भजनांकडे परत

रात्री दिवस वाहातसे चिंता

ratri divas vahatase chinta

रात्री दिवस वाहातसे चिंता । केशव धडौता होईन मी ॥१॥ खिरजट घोंगडें फ़ाटकें तें कैसें । वेंचिलें तैसें भोगिजगा ॥ध्रु०॥ वित्त नाहीं गाठीं जीवित्वा आटी । उघडी पाठी हींव वाजे ॥२॥ घोंगडें देईल तो एक दाता । रखुमादेविवरा मागों रे आतां ॥३॥