भजनी मालिका
← भजनांकडे परत

रात्रदिवस मन रंजलें । हरिचरणीं चित्त जडलें । विरहाचें दुःख फिटलें । धन्य झालें संसारीं

ratradivas man ranjalen | haricharanin chitta jadalen | virahachen duhkh phitalen | dhanya jhalen sansarin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रात्रदिवस मन रंजलें । हरिचरणीं चित्त जडलें । विरहाचें दुःख फिटलें । धन्य झालें संसारीं ॥१॥ विरह गेला सुख झालें वो माया । पुढतोपुढती आनंद न समाये ॥धृ॥ संतसंग घडला धन्य आजीं । मोह ममता तुटली माझी । भ्रांती फिटोनि गेली सहजीं । विरह गेला सुख झालें आजीं ॥२॥ धन्य धन्य संतसंगती । अवधी झाली विश्राती । एका जनार्दनी चिंत्तीं । विरहभ्रांति निरसली ॥३॥