भजनी मालिका
← भजनांकडे परत

रतीच्या अंती जें होय सुख । सर्वांगीं तें सर्वदा देख

ratichya anti jen hoy sukh | sarvangin ten sarvada dekh

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रतीच्या अंती जें होय सुख । सर्वांगीं तें सर्वदा देख ॥१॥ इंद्रियाविण आहे गोडी । तेथींचा स्वादु कवण काढी ॥२॥ आधींच करणी कैसी यक्षिनी । गोडपणें कैसी देत आहे धणी ॥३॥ एका जनार्दनीं लागला छंदु । एकपणेंविण घेतला स्वादु ॥४॥