भजनी मालिका
← भजनांकडे परत

रांगतु रंगणीं चोरितु लोणी धांवोनि धरिती गौळणी

rangatu ranganin choritu loni dhanvoni dhariti gaulani

रांगतु रंगणीं चोरितु लोणी धांवोनि धरिती गौळणी । बांधतिचरणीं देति गार्‍हाणीं यशोचे साजणी । दधि घृत भक्षून तमाळनीळें नवल केलें साजणी ॥१॥ कृष्ण आळिवा । परतोनि मातें दावा ॥ध्रु०॥ कृष्णा कान्हा मधूसूदना कामिनी मनमोहना । योगि ध्याना हरस्मरणा । गोपी ध्याना । मानिती कान्हा । बोलती यमुना ॥२॥ नेणवसी नेणवसी । आकळु तूं नाकळसी ॥ध्रु०॥ इंद्रनिळा श्रुति जनकिरळा । सुरी जघन सांवळा । कंठीं माळा कौस्तुभ गळा । प्रीति तुळसी द्ळा ।’ कांसे शेला सोनसळा उभा बळिभद्राजवळा ॥३॥ कृष्ण सांवळा डोळसु । सहजे परमहंसु ॥ध्रु०॥ सदानंदा श्रीमुकुंदा । श्रीहरि परमानंदा । आनंदकंदा । अभय प्रल्हादा । पावकनादा धेनुलुब्धा । गोविंदा गोपाळा ॥४॥ कृष्ण आमुचा आमुचा । खेळिया गौळियाचा ॥ध्रु०॥ कर्पुरगौरा मन स्थिरा । पुराण गुणगंभिरा । विरादिवीरा महाविरापांडवदळ साह्यकारा । मथुरा नगरा कंसासुरा । शिक्षा लाविसी चाणुरा । अति सुंदरा तूं पेंडारा ॥ बापरखुमादेविवरारे ॥५॥ जाणितलें जाणितलें माझें मज दिधलें ॥ध्रु०॥