भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामराम उच्चारितां । नुरे संसाराची चिंता

ramaram uchcharitan | nure sansarachi chinta

रचनाकार: संत निळोबा · अभंग
रामराम उच्चारितां । नुरे संसाराची चिंता ॥१॥ राम हाचि दीनबंधु । तोचि तारी भवसिंधु ॥२॥ दृष्टी रामरुपीं रंगली । आत्माराम होऊनि ठेली ॥३॥ निळा म्हणे राम हरी । हेचि भवसागर तारी ॥४॥