भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामनामेंसुख अत्यंत जें आहे । म्हणोनि मना ध्याये नित्य नाम

ramanamensukh atyant jen ahe | mhanoni mana dhyaye nitya nam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रामनामेंसुख अत्यंत जें आहे । म्हणोनि मना ध्याये नित्य नाम ॥१॥ सुखाचिया गोडी जया नाहीं ठावीं । ते ते नर असोनिया देहीं प्रेतवत ॥२॥ शंकर जाणोनि स्मशानीं राहिला । अनुभव तो त्याला तोचि जाणें ॥३॥ एका जनार्दनीं सुखाचेंजें सुख । रामनाम देख पवित्र मुखीं ॥४॥