भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामनाम ज्याचे मुखीं । तो नर धन्य तिहीं लोकीं

ramanam jyache mukhin | to nar dhanya tihin lokin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रामनाम ज्याचे मुखीं । तो नर धन्य तिहीं लोकीं ॥१॥ रामनामें वाजेटाळी । महादोषा होय होळी ॥३॥ रामनाम सदा गर्जे । कळेकाळ भय पाविजे ॥४॥ ऐसा रामनामीं भाव । तया संसाराचि वाव ॥५॥ आवडीने नाम गाय । एका जनार्दनीं वंदी पाय ॥६॥