भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामनाम जपे शिव तो स्मशानीं । वाल्मिक तो मुनी नाम जपे

ramanam jape shiv to smashanin | valmik to muni nam jape

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रामनाम जपे शिव तो स्मशानीं । वाल्मिक तो मुनी नाम जपे ॥१॥ गणिका तारिली रामनाम घेतां । पातकी तत्त्वतां उद्धरिले ॥२॥ रामनाम सुख शिव जाणें तत्वतां । येरांसी महत्व न कळे नाम ॥३॥ साधनांचे सार नाम मुखी गात । रामनाम म्हणतां कार्यसिद्धि ॥४॥ एका जनार्दनीं रामनाम जप । वैकुंठीचा सोपा मार्ग तुम्हां ॥५॥