भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम भावाचा भुकेला । सांडोनी दुर्योधनसदनाला

ram bhavacha bhukela | sandoni duryodhanasadanala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
राम भावाचा भुकेला । सांडोनी दुर्योधनसदनाला ॥१॥ विदुर गृहाप्रति गेला । विश्रांति तेथें पावला ॥२॥ शबरींची फळें भक्षी । क्षीरनिधी शयन साक्षी ॥३॥ एका जनार्दनीं निश्चय ऐसा । देव भक्ताधीन सहसा ॥४॥