भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम आठवितां नुरेचि पैं पाप । ऐसा दाखव मज पा कोणी एक

ram athavitan nurechi pain pap | aisa dakhav maj pa koni ek

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
राम आठवितां नुरेचि पैं पाप । ऐसा दाखव मज पा कोणी एक ॥१॥ नाम त्रिभुवनीं वरिष्ठ साचार । म्हणोनि निर्धार सनकदिकीं ॥२॥ एका जनार्दनीं जपतां निर्धारें । भवसिंधु तरे रामनामें ॥३॥