भजनी मालिका
← भजनांकडे परत

रक्तवर्ण स्थूळ श्वेत हें सूक्ष्म

raktavarna sthul shvet hen sukshma

रक्तवर्ण स्थूळ श्वेत हें सूक्ष्म । कारण तें श्याम ऐसें देखा ॥१॥ निळावर्ण देह महाकारण साजिरा । ज्योतीचा मोहरा अलक्ष लक्ष्मी ॥२॥ ज्ञानदेव म्हणे सर्व हें चैतन्य । मन हेंची धन्य धन्याचेनी ॥३॥