भजनी मालिका
← भजनांकडे परत

राजा म्हणे रजकहि गाठी । आहेत पांचशे आणिक जेठी । मातंगकुळवई ही उग्रदृष्टी । सोडितां वरी झगटेल

raja mhane rajakahi gathi | ahet panchashe anik jethi | matangakulavai hi ugradrushti | soditan vari jhagatel

रचनाकार: संत निळोबा · अभंग
राजा म्हणे रजकहि गाठी । आहेत पांचशे आणिक जेठी । मातंगकुळवई ही उग्रदृष्टी । सोडितां वरी झगटेल ॥१॥ परी तो येथें येईल कैसा । आलिया कदाचित करील वळसा । ऐसें विचारी जंव मानसा । तंव प्रधानहि पातले ॥२॥ राजा तयातें विचारी आणवितां कैसे येथें हरी । तंव ते म्हणती युक्ती माझारीं । हेंचि उत्तम दिसतसे ॥३॥ येथें आपुले सैन्यक । अपार काळाहुनी अधिक् । कृष्ण्‍ा येईल एकला एक । चारी अर्भकें घेउनी ॥४॥ तयां मागें कैची सेना । गोवळ गाईचा राखणा । करिती घरींचि चार नाना । येथें काय बळ त्यांचें ॥५॥ येतांचि आपुले शिवेआंत । शस्त्रपाणी करिती घात । ऐसाचि साधावा कार्यार्थ । विचार हाचि मानिला ॥६॥ निळा म्हणे आणिती काळ । घरां प्रार्थूनियां ते सकळ । ओढवलिया निदान वेळ । अघटितचि सहज घडे ॥७॥