भजनी मालिका
← भजनांकडे परत

राग आला तरी । माय बाळातें नाव्हेरी

rag ala tari | may balaten navheri

रचनाकार: संत निळोबा · अभंग
राग आला तरी । माय बाळातें नाव्हेरी ॥१॥ राखे त्याची भूक तान । न मारी कापूनियां मान ॥२॥ शांतवुनी स्तनी । लावी तया न्याहाळुनी ॥३॥ निळा म्हणे धरी । अंकी तया माया करी ॥४॥