भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुंडलिकापुढें सर्वेश्वर । उभा कटीं ठेउनी कर

pundalikapudhen sarveshvar | ubha katin theuni kar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पुंडलिकापुढें सर्वेश्वर । उभा कटीं ठेउनी कर ॥१॥ ऐसा पुंडलिकापुढें हरी । तो पुजावा षोडशोपचारी ॥२॥ संभोवता वेढा संतांचा । आनंद होतो हरिदासांचा ॥३॥ एका जनार्दनीं देव । उभा विटेवरी स्वयमेव ॥४॥