भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुंडलीक पांडुरंग । संतसंग पदयाळें

pundalik pandurang | santasang padayalen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पुंडलीक पांडुरंग । संतसंग पदयाळें ॥१॥ चंद्रभागा वाळवंट । भूवैकुंठ पंढरी ॥२॥ वेणुनाद गोपाळपुर । पुष्पावती सार संगम ॥३॥ निळा म्हणे झाला मेळा । या भूगोळा उध्दार ॥४॥