भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुंडलीक म्हणे हरी । राहे वरि विटे उभा

pundalik mhane hari | rahe vari vite ubha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पुंडलीक म्हणे हरी । राहे वरि विटे उभा ॥१॥ अवलोकिन वेळोवेळां श्रीमुख डोळां रुप तुझें ॥२॥ अलभ्य लाभ लक्ष कोटी । झाले भेटी दिली तुम्हा ॥३॥ निळा म्हणे मग पुंडलीक । करी पूर्वकविधी पूजा ॥४॥