भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुजी माझिया भक्तांतें । तेणें संतोष होत मातें

puji majhiya bhaktanten | tenen santosh hot maten

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पुजी माझिया भक्तांतें । तेणें संतोष होत मातें ॥१॥ भक्त माझा मी भक्तांचा । ऐसी परंपरा साचा ॥२॥ देवभक्तपण । वेगळीक नाहीं जाण ॥३॥ भक्त जेवितांची धालो । एका जनार्दनीं लाधलो. ॥४॥