भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूजा यथासांग पूर्ण । न घडे तरी संतपूजन

puja yathasang purna | na ghade tari santapujan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पूजा यथासांग पूर्ण । न घडे तरी संतपूजन ॥१॥ करितां ऐसा संकल्प । तेणें जोडे महातप ॥२॥ ध्यानीं ध्यातां संतचरण । होईल मना समाधान ॥३॥ ऐसा पूजेचा सोहळा । एका जनार्दनीं पाहे डोळां ॥४॥