भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुढारले विठ्ठल हरी । केली नगरी वैकुंठ

pudharale viththal hari | keli nagari vaikunth

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पुढारले विठ्ठल हरी । केली नगरी वैकुंठ ॥१॥ सुदर्शन ठेविलें तळीं । म्हणे कल्पजळीं बुडों नेदी ॥२॥ तैसेचि धरिले क्षेत्रावरी । म्हणती हे नगरी रक्षावी ॥३॥ निळा म्हणे या पुंडलिकें । यापरी लोकें उध्दरिलीं ॥४॥