भजनी मालिका
← भजनांकडे परत

पृथ्वीवरुता दुष्काळ पडला । न मिळे कोणाला धान्यकण

pruthvivaruta dushkal padala | na mile konala dhanyakan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पृथ्वीवरुता दुष्काळ पडला । न मिळे कोणाला धान्यकण ॥१॥ समर्थे तीं सत्व टाकिती बापुडीं । दुबळ्या तांतडीं कोण पुसे ॥२॥ एका जनार्दनीं काळाचें तें मान । सुदामा ब्राम्हण दैन्यवाणा ॥३॥