भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रेमें भक्तांची आवडी । म्हणोनियां धूतो घोडी

premen bhaktanchi avadi | mhanoniyan dhuto ghodi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रेमें भक्तांची आवडी । म्हणोनियां धूतो घोडी ॥१॥ ऐसा प्रेमाचा भुकेला । सेवक जाहला बळीद्वारीं ॥२॥ उच्छिष्ट फळें भिल्लणींची । खायें सांची आवडीनें ॥३॥ एका जनार्दनीं उदार । तो हा सर्वेश्वर विटेवरी ॥४॥