भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रेमयुक्त भजन करी सर्वकाळ । विठ्ठल विठ्ठल बोले वाचे सदा

premayukta bhajan kari sarvakal | viththal viththal bole vache sada

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रेमयुक्त भजन करी सर्वकाळ । विठ्ठल विठ्ठल बोले वाचे सदा ॥१॥ मृत्तिका भिजवी भाजनाकारणें । प्रेमयुक्त नाचणें नाममुखीं ॥२॥ एके दिनीं कांता ठेवुनी जवळी बाळ । उदकालागीं उताविळ जाती जाहली ॥३॥ एका जनार्दनीं मूल तें रांगत । आलें असे त्वरित मृत्तिकेजवळीं ॥४॥