भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रेमळ प्रेमळ अंतरीं प्रेमळ । नाहीं काळ वेळ तयालागीं

premal premal antarin premal | nahin kal vel tayalagin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रेमळ प्रेमळ अंतरीं प्रेमळ । नाहीं काळ वेळ तयालागीं ॥१॥ प्रेमभावें गाय विठ्ठलाचि ध्याय । मग सुखा उणें काय संसारीया ॥२॥ जनार्दनाचा एक रंगला चरणीं । निजरंगीं रंगोनि मिळोनि गेला ॥३॥