भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रेम देऊनि सरतें केलें । आपुल्या नामें गौरविलें । माझिये वाचे श्रुंगारिले । गुणरत्नीं अमोघां

prem deuni saraten kelen | apulya namen gauravilen | majhiye vache shrungarile | gunaratnin amoghan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
प्रेम देऊनि सरतें केलें । आपुल्या नामें गौरविलें । माझिये वाचे श्रुंगारिले । गुणरत्नीं अमोघां ॥१॥ सर्वगुणीं गुणभरिता । सर्व रुपीं रुपमंडिता । सर्वकळा तूं कुशळता । साजती अनंता ब्रीदें चरणीं ॥२॥ सर्व गोमटा धरीत्या नामें । सर्व गोमटा करीत्या कर्मे । गोमटा जाणत्या वर्मे । सर्वी सर्व गोमटा तूं ॥३॥ मुख सुंदर अंगकांति । रुपसुंद मदनमूर्ति । यश सुंदर तुमची कीर्ती । अहो जगपती जगदानिया ॥४॥ निळा तुमचा शरणागत । तुमचे नामीं ठेविलें चित्त्‍ा । तुमच्या ब्रिदावळी पढत । करावा सनाथ म्हणउनी ॥५॥