भजनी मालिका
← भजनांकडे परत

पोटींचे बाळ अवगुणी वोखटें । परी मायबाप स्नेहो मोठें

potinche bal avaguni vokhaten | pari mayabap sneho mothen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पोटींचे बाळ अवगुणी वोखटें । परी मायबाप स्नेहो मोठें ॥१॥ तयापारी उदरा आलों जी स्वामी । अवगुणांच्यापरी नुपेक्षा तुम्हीं ॥२॥ गुण नाहीं तेथे कर्म कैंचे धड । परी मायाबाप वाटतसे कोड ॥३॥ एका जनार्दनीं उद्भव साचें । म्हणोनि हरिदासा कौतुक त्यांचे ॥४॥