भजनी मालिका
← भजनांकडे परत

पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा । हरिविण सारा व्यर्थ भ्रम

pindi dehasthiti brahmandi pasara | harivin sara vyartha bhram

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा । हरिविण सारा व्यर्थ भ्रम ॥१॥ शुक याज्ञावल्क्या दत्त कपिल मुनी । हरीसी जाणोनी हरिच झाले ॥२॥ या रे या रे धरुं हरिनाम तारुं । भवाचा सागरु भय नाहीं ॥३॥ साधुसंत गेले आनंदीं राहिलें । हरिनामें झाले कृतकृत्य ॥४॥ एका जनार्दनीं मांडिलें दुकान । देतो मोलविण सर्व वस्तु ॥५॥