भजनी मालिका
← भजनांकडे परत

फणस जंबीर कर्दळी दाटा । हातीं घेऊनि नांरगी फाटा

phanas jambir kardali data | hatin gheuni nanragi phata

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
फणस जंबीर कर्दळी दाटा । हातीं घेऊनि नांरगी फाटा ॥१॥ वारियाने कुंडलें हाले । डोळे मोडित राधा चाले ॥२॥ राधा पाहून भुललें हरी । बैल दुभें नंदाघरी ॥३।। हरी पाहूनि भुलली चित्ता । राहा घुसळी पडेरा रिता ॥४॥ मन मिनलेंसें मना । एका भुलला जनार्दना ॥५॥