भजनी मालिका
← भजनांकडे परत

फजितखोरांचे जीवीं । लाज नाहीं सर्वथा

phajitakhoranche jivin | laj nahin sarvatha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
फजितखोरांचे जीवीं । लाज नाहीं सर्वथा ॥१॥ सांगता ते न धरती मनीं । नायकती कानीं शिकविलें ॥२॥ म्हैसा जैसा उन्मत्त मदें । काम छंदें तेवीं नाचे ॥३॥ एका जनार्दनीं ते पामर । जन्म वेरझार भोगिती ॥४॥