भजनी मालिका
← भजनांकडे परत

पेंडारा दाऊनियां थोकसी

pendara dauniyan thokasi

पेंडारा दाऊनियां थोकसी । देखिलें पण केविं जाये अंग लपविसी । तरी वेधा काय करिसी । मा शहाणपण तुझें नव्हेरे गोंवळा ॥१॥ आम्ही येकविध जीवें तुवा केलें अधातुरें वर्षावो वोसरलिया बोल्हासु जाय तैसी न होत प्रेमळ उखरें गोंवळा ॥२॥ देखी गुंफ़लिया फ़ुलें डाळलिया आहाच तंव कांही न दिसेरें । परि घ्राणा इंद्रियांच्या अंगसुखा समर्थ कोणा असेरे गोंवळा ॥३॥ या बोला मानवोंनि बापरखुमादेविवरे विठ्ठलें दिधलें आप आपणियातें । तैंपासुनि तें लपणेंचि पारुषले उभा पंढरिये येणें वेषेरें गोंवळा ॥४॥