भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतिव्रता सती उठोनि सकाळीं । शेजारिणी सदनीं येती जाहली

pativrata sati uthoni sakalin | shejarini sadanin yeti jahali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पतिव्रता सती उठोनि सकाळीं । शेजारिणी सदनीं येती जाहली ॥१॥ अहो माते पती जाती कृष्ण दरुशना । कांही तरी धान्य देईं मज ॥२॥ ऐकोनियां ऐसें पतिव्रतेचें वचन । जाहलें समाधान चित्त तेणें ॥३॥ एका जनार्दनीं हरिकृपा पूर्ण । पोहे दिले जाणा तीन मुष्टी ॥४॥