भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतितपावन म्हणोनि ऐकत होतो दुरुनी

patitapavan mhanoni aikat hoto duruni

रचनाकार: संत बोधले · अभंग
पतितपावन म्हणोनि ऐकत होतो दुरुनी । ते आह्यालागुनी कळो आले ॥१॥ मी आरुस साबड माझे बोलणे बोबडे । परि तुज आवडले पांडुरंगा ॥ २॥ कळा गा कुसरी नये मज गाता । परि वो पंढरीनाथा आंगिकारले ॥३॥ बोधला म्हणे देवा वानले तुझ्या भावा । कळो आल्या केशवा मायबापा ॥४॥