भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतीतपावन केलें असें संतीं । पुराणीं ती ख्याती वर्णियेली

patitapavan kelen asen santin | puranin ti khyati varniyeli

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पतीतपावन केलें असें संतीं । पुराणीं ती ख्याती वर्णियेली ॥१॥ सदोषी अदोषी तारिलें अपार । हाचि बडिवार धन्य जगीं ॥२॥ नाना वर्ण याती उत्तम चांडाळ । उद्धरिलें सकळ नाममात्रें ॥३॥ एका जनार्दनीं दयेचें सागर । संतकृपा धीर समुद्र ते ॥४॥