भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतित पावना जानकीजीवना

patit pavana janakijivana

रचनाकार: संत बोधले · अभंग
पतित पावना जानकीजीवना । सर्व सुखाच्या हरि बापा निधाना ॥१॥ ऐसे पतित तो किती उद्धरिले । शरण आलिया कोण गेले ॥ २॥ आसे पतित तो उद्धरिले किती । बापस्वामी या लक्ष्मी पति ॥३॥ दुष्ट कौरवी कपट रचिले । करुनिया विवर कैसे पांडवा नेले ॥४॥ दुष्ट कौरवी द्रुपदी पांचालि । ऐकोनि वचन कैसी धावणी केली ॥५॥ जैसे पवाडे तुझे जगी गर्जती । महा महा पतित तो वो उध्दरिले किती ॥६॥ जैसे ब्रीदे रे तुझी किती वाखाणु । बोधला म्हणे हे सुखाचे निधान ॥७॥