भजनी मालिका
← भजनांकडे परत

पशुमुखें ज्ञानेश्वर । करविलां उच्चार वेदघोषु

pashumukhen dnyaneshvar | karavilan uchchar vedaghoshu

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पशुमुखें ज्ञानेश्वर । करविलां उच्चार वेदघोषु ॥१॥ तैसेचि तुम्हीं मजही केलें । सामथ्यें वदविलें आपुलिया ॥२॥ मी तों मुळींचाचि मतिमंद । जाणोनियां भेद अंतरींचा ॥३॥ निळा म्हणे अंगिकार । केला जी वर देऊनियां ॥४॥