भजनी मालिका
← भजनांकडे परत

पशु पक्षी जीव श्वापदें वनचरें । अवघीं कृष्णाकारें झालीं तयां

pashu pakshi jiv shvapaden vanacharen | avaghin krushnakaren jhalin tayan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पशु पक्षी जीव श्वापदें वनचरें । अवघीं कृष्णाकारें झालीं तयां ॥१॥ माडया उपरमाडया बैसती बैसणीं । नाना अलंकार लेणीं झाला कृष्ण ॥२॥ मनीं त्यांचे कृष्ण ध्यानी त्यांचे कृष्ण । श्रवणीं त्यांचे कृष्ण वदनीं वाचे ॥३॥ निळा म्हणे कृष्णीं झाल्या कृष्णरुप । अवघ्या नामरुप क्रियासहित ॥४॥