भजनी मालिका
← भजनांकडे परत

पश्चिममार्ग बापा प्रणव कीं दे सांग

pashchimamarga bapa pranav kin de sang

पश्चिममार्ग बापा प्रणव कीं दे सांग । जेथें असे महालिंग तेजोमय ॥१॥ चंद्रांतील जल ते सत्रावी केवळ । नादबिंदा कल्होळ गर्भी झाला ॥२॥ ज्ञानदेव म्हणे देह हा दुर्लभ । त्रैलोकीं सुलभ भजनाचा ही ॥३॥