भजनी मालिका
← भजनांकडे परत

पर्वताप्रमाणे पातक करणें

parvatapramane patak karanen

पर्वताप्रमाणे पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तांसी ॥१॥ नाहीं ज्यासी भक्ति तो पतित अभक्त । हरिसी न भजत दैवहत ॥२॥ अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैसेनि गोपाळ पावे हरि ॥३॥ ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वाघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥