भजनी मालिका
← भजनांकडे परत

परियेसी रुक्माई जैसा बैसला पार्टी दैन्य पैं न सोडी काय करूं

pariyesi rukmai jaisa baisala parti dainya pain na sodi kay karun

रचनाकार: संत राजाई · अभंग
परियेसी रुक्माई जैसा बैसला पार्टी दैन्य पैं न सोडी काय करूं।।१।। सदैवाच्या खिया अलंकारमंडित। मजवरी नाहीं प्रीत काय करूं।।२।। दरिद्रे विश्रांति घातली वो कैसी सांगो कोणापाशीं माउलिये ॥३॥ एकी दिव्य व नेसल्या परिकर मज खंडे जर्जर मिळालेसें ||४|| मोडकें खोंपट वारा येतो भराभराट बहु होती कष्ट कोणा सांगों ।।५।। कैंची कुसुमसेज कैंचे पटकुळ फाटकी वाकळ अंथरूणा ||६|| कन्या आणि पुत्र जाली उपवरी। अजोनि न घरी घर प्राणनाथ ॥ ७॥ जनलोकांमाजीं केलें येणें हार्से म्हणती लागलें पिसें नामयासी ||८|| जन्मीं न देखे उपाय येणें केले अपाये कोणा सांगो माये सुखदुःख ||९।। आमुच्या वडिलां शस्त्र सुई आणि कातरी हा बाण आणि सुरी वागवितसे ।।१०।। एकांतें भाकिलें रुदना करि त्याची नारी चाहियेली सुरी नागनाथ ।।११।। लज्जेचा हा गांव सांडियेला येणें शिकवावें कोणें माउलिये ।।१२।। संसाराचा येणें सांडिला पसारा कणव स्त्री बाळा न ये कैसी।।१३।। नसतां विठोबा नसतां पंढरी तरी हा सुर्खे घरी नांदतां कीं।।१४।। होणार होऊन गेले शिकवूं आतां काई विनविते राजाई रखुमाईसी ।। १५ ।।