भजनी मालिका
← भजनांकडे परत

परियेसी गव्हारा सादर

pariyesi gavhara sadar

परियेसी गव्हारा सादर । कर्मे निर्वश झाले सगर । भिल्लें विंधिले शारंगधर । झाला पुरंदर सहस्त्र नयन ॥१॥ कर्मे मन्मथ झालासे राख । कर्मे चंद्रासि घडला दोष । कर्मे भार वाहती कुर्मशेष । कर्मे खरमुख ब्रह्मा देखा ॥२॥ कर्मे वासुकी लंके दिवटा । कर्मे हनुमंता उदरीं कांसोटा । कर्मे शुकदेव गर्भी कष्टा । पाताळवाटा बळी गेला ॥३॥ कर्मे दशरथ वियोगें मेला । कर्मे श्रीराम वनवासा गेला । कर्मे रावण क्षयो पावला । वियोग घडला सीतादेवी ॥४॥ कर्मे दुर्योधनादि रणीं नासले । कर्मे पांडव महापंथें गेले । कर्मे सिंधुजळ शोषिलें । नहुष जाला सर्प देखा ॥५॥ कर्मातें शंभु मानी आपण । किती पळसि कर्माभेण । बापरखुमादेविवरविठ्ठला शरण । केलीं कर्मे निवारी नारायण ॥६॥