भजनी मालिका
← भजनांकडे परत

परिमळ गेलिया वोस फुल देठीं । आयुष्य शेवटीं देह तैसा

parimal geliya vos phul dethin | ayushya shevatin deh taisa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
परिमळ गेलिया वोस फुल देठीं । आयुष्य शेवटीं देह तैसा ॥१॥ घदिघडी काळ वाट याची पाहे । अझुनि किती आहे अवकाश ॥२॥ हाचि अनुताप घेऊनि सावाध । कांहीं तरी बोध करीं मना ॥३॥ एक तास उरला खटवांगरायासी । भाग्यदशा कैसीप्राप्त झाली ॥४॥ सांपडला हरि तयाला साधनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥