भजनी मालिका
← भजनांकडे परत

परेसी जंव पाहे तंव दिसे हें अरुतें

paresi janv pahe tanv dise hen aruten

परेसी जंव पाहे तंव दिसे हें अरुतें । तळीं तळाखालतें विश्वरुप ॥१॥ दिव्य चक्षूदृष्टि निवृत्तीनें दिधली । अवघीच बुझाली विष्णुमाया ॥२॥ शम दम कळा दांत उदांत । शंतित्तत्त्व मावळत उपरमेसी ॥३॥ रयनि दिनमणी गगनासकट । अवघेची वैकुंठ तया घरीं ॥४॥ उध्दट कारण केलें हो ऐसें । तुष्टोनि सौरसें केलें तुम्हीं ॥५॥ ज्ञानदेव शरण निवृत्तीच्या चरणा । कांसवीचा पान्हा पाजीयेला ॥६॥