भजनी मालिका
← भजनांकडे परत

परमार्थाचा हाचि भाव । वाचे देव स्मरावा

paramarthacha hachi bhav | vache dev smarava

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
परमार्थाचा हाचि भाव । वाचे देव स्मरावा ॥१॥ नाहीं दुजा छंद मनीं । संतचरणीं विश्वास ॥२॥ न धांवे वायां कोठें मन । संतचरणांवाचुनी ॥३॥ एका जनार्दनीं नेम । सर्वोत्तम हृदयीं वसे ॥४॥