भजनी मालिका
← भजनांकडे परत

परमानंद आजि मानसिरे

paramanand aji manasire

परमानंद आजि मानसिरे । भेंटि जाली संतासिरे ॥१॥ पूर्वजन्मीं सुकृते केलीं । तीं मज आजि फळासी आलीरे ॥२॥ मायबाप सकळ सोयरे यातें । भेटावया मन न धरेरे ॥३॥ एक तीर्थहूनि आगळे । त्यामाजि परब्रह्म सांवळेरे ॥४॥ निर्धनासी धनलाभ जालारे । जैसा अचेतनीं प्रगटलारे ॥५॥ वत्स विघडलिया धेनु भेटलीरे । जैसी कुरंगिणी पाडसा मिनलीरे ॥६॥ पियूशापरतें गोड वाटतेरे । पंढरीरायाचे भक्त भेटतारे ॥७॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलेरे । संत भेटता भवदु:ख तुटलेरे ॥८॥