भजनी मालिका
← भजनांकडे परत

परलोकींचे सखे । संत जाणावे ते देखे

paralokinche sakhe | sant janave te dekhe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
परलोकींचे सखे । संत जाणावे ते देखे ॥१॥ तोडिती दरुशनें बंधन । करिती खंडन कर्मांचें ॥२॥ उत्तम जें नामामृत । पाजिती त्वरित मुखामाजीं ॥३॥ एका जनार्दनीं संतपाय । निरंतर हृदयीं ध्याय ॥४॥