भजनी मालिका
← भजनांकडे परत

परदारा परधन । येथें धांवतसे मन

paradara paradhan | yethen dhanvatase man

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
परदारा परधन । येथें धांवतसे मन ॥१॥ मन जाए दुरदेशीं । वोढूनी आणा चरणापाशीं ॥२॥ दुर्बुद्धि मनाचें ठाणें । मोडोनी टाका पुरतेपणें ॥३॥ एका जनार्दनीं मन । आपुलें पदीं राखा जाण ॥४॥